Breaking news

महामंडळांवर राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या सदस्यांना संधी द्या; मळवली येथील चिंतन शिबीर ठराव मंजुर

कार्ला : महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस  सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा जवळील मळवली या ठिकाणी चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

  महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष, शहराध्यक्ष प्रदेश पदाधिकारी यांची आगामी जिल्हापरिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चिंतन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या चिंतन शिबीराला महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री संजय बनसोडे व माजी विधानपरिषदेचे आमदार जयदेव गायकवाड, उपाध्यक्ष पंडीत कांबळे यांनी उपस्थित पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले.

चिंतन शिबीरात खालील ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आले.

आगामी वाटप करण्यात येणाऱ्या महामंडळावर राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या सदस्यांना सधी देण्यात यावी. आगामी काळात होणाऱ्या निवडणूकांमध्ये मागासवर्गीय उमेदवारांना उमेदवारी देण्यात यावी. मागासवर्गीय अर्थिक विकास योजनेच्या माध्यमातून मागासवर्गीयांना निधी उपलब्ध करुन मिळावा. समाजातील विद्यार्थांना शिक्षणासाठी शिष्यवृती मिळवण्यासाठी प्रयत्न करावे. रमाई घरकुल योजनेतून बेघर लोकांना घरकुल बांधून द्यावा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विकास निधी तत्काळ वितरित करुन गावा गावातील  मागासवर्गीय लोकांच्या विकासाला व उद्योगधंद्याला चालना द्यावी. असे अनेक ठराव एकमताने चिंतन शिबिरात मंजूर करण्यात आले.

   त्याच बरोबर जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्‍यांनी आपल्या मनोगतात पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन माजी आमदार जयदेव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विकास लोखंडे, विशाल लोखंडे, अरुण काळे, मयुर गायकवाड व  राष्ट्रीय सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आले होते.

इतर बातम्या