Breaking news

Lonavala News : लोणावळ्यात उद्या मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

लोणावळा : लोणावळा शहरात उद्या बुधवारी (10 ऑगस्ट) रोजी भव्य स्वरुपात मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन रायवुड विभागातील आँक्झिलियम काॅन्व्हेंट शाळेच्या समोरील भोरी सेनेटेरियम याठिकाणी करण्यात आले आहे. आमदार सुनिलआण्णा शेळके युवामंचा चे धनंजय वसंत काळोखे यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेत नेत्र तपासणी करून घ्यावी. ज्या कोणाला मोतीबिंदू चा त्रास आहे त्यांनी शस्त्रक्रियेचा लाभ घ्यावा. आमदार सुनिल आण्णा शेळके युवामंच व एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय यांच्या विद्यमानाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे धनंजय काळोखे यांनी सांगितले.

इतर बातम्या