छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल रोजगार वर्धन कार्यक्रमांतर्गत लोणावळ्यात मराठा समाजातील तरुणांना मोफत संगणक प्रशिक्षण

लोणावळा : जयहिंद लोकचळवळ लोणावळा यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल रोजगार वर्धन CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ SARTHI DIGITAL EMPLOYABILITY ENHANCEMENT PROGRAM (CSMS- DEEP) कार्यक्रमांतर्गत लोणावळ्यातील मराठा समाजातील तरुणांना मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जवळपास 20 हजार रुपये फी असणारा हा कोर्स पूर्णतः मोफत शिकवला जाणार आहे.
गणेश चतुर्थी च्या मुहूर्तावर (19 सप्टेंबर) महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा या कोर्सचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सत्यजित तांबे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. लोणावळ्यातील या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सचिव व लोणावळा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक निखिल कविश्वर, पत्रकार भाऊसाहेब म्हाळसकर, पत्रकार विशाल पाडाळे, शुभम जोशी, श्रवण चिकणे, मनसे शहराध्यक्ष भारत चिकणे, संजय तळेकर, निखिल भोसले, चैतन्य वाडेकर, प्रसाद घोडके व आदी उपस्थित होते. लोणावळ्यातील आर्चिल इन्फोबिझ या ठिकाणी सदरचा कोर्स शिकवला जाणार आहे.