Breaking news

जीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी वनसंवर्धन करणे आवश्यक – डॉ. निलेश काळे

वाढते प्रदूषण तसेच लोकसंख्या वाढीचा परिणाम वातावरण बदलावर मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे. यामुळे जीवसृष्टीची होणारी अधोगती थांबवण्यासाठी व जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी, जीवसृष्टीचा विनाश होणार नाही यासाठी अत्यावश्यक अशा पर्यावरणातील नैसर्गिक गोष्टी नैसर्गिक यंत्रणा टिकवणे ही अत्यंत गरज आहे. त्या दृष्टीने सतत कृतीशील प्रयत्न करणे आवश्यक आहे. आशिया खंड हा लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात जास्त लोकसंख्या असणारा खंड म्हणून ओळखला जातो. पूर्वी चीनकडे लोकसंख्या वाढीचा दर जास्त किंवा लोकसंख्या सर्वात जास्त असलेला देश म्हणून पाहिले जायचं, सद्यस्थितीमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये भारताने चीनला देखील पाठीमागे टाकलेला आहे. भारताची लोकसंख्या वाढ पाहता ती पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय मोठी  हानिकारक बाब आहे. 

      मानव आपल्या कृतीतून वनक्षेत्रांचा नाश करीत आहे. निसर्गाला दुर्बलतेकडे नेत आहे. त्यामुळे पाऊस पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पशुपक्षी कीटकनाशक यावर विपरीत परिणाम  होत आहे.  वनस्पती वने ही नष्ट होताना दिसून येत आहे. वने म्हणजे काय वृक्षाचा संच होय. तर मानवी जीवन, मानवी नव्हे तर सर्व सजीव सृष्टीला आवश्यक असणारा ऑक्सिजन पुरवण्याचे काम ही वने करतात. वने नसेल तर सजीव सृष्टी नष्ट होईल यात कुठल्याही प्रकारे शंका वाटत नाही. कारण, वृक्ष  नसेल तर पाऊस पडण्यावरती परिणाम होणार आहे. वृक्ष नसेल तर जीवसृष्टीच नसणार आहे. म्हणजेच काय ऑक्सिजन पुरवण्यामध्ये वृक्षांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. वनांना मानवी तसेच सजीवांचे फुफ्फुस म्हणून देखील ओळख प्राप्त होत आहे. वृक्ष हे कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन पुरवतात मानव अनेक प्रकारच्या वनक्षेत्राचा नाश करीत आहे. निसर्गाला दुर्बलतेकडे नेत आहे. त्यामुळे पाऊस पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पशुपक्षी कीटक हे नाहीसे होत चाललेले आहे. वने कमी झाले तर जंगली प्राणी ही मानवी वस्तीमध्ये येताना दिसत आहे. त्याचबरोबर औषधी वनस्पती व अन्य वनस्पती सुद्धा किंवा प्राण्यांच्या काही विशिष्ट जाती या नष्ट होताना दिसत आहे. अंदाधुंद पणे मानवाने केलेली जंगलतोड ही भविष्यातील मोठी समस्या निर्माण झाली आहे. वने ही माणूस व निसर्ग या दोघांच्या सुदृढ भवितव्यासाठी बहुमूल्य आहेत. जमिनीची धूप थांबवण्यामध्ये वनांचा मोठा वाटा आहे. जलसंधारण करून जलचक्र सुस्थितीत ठेवण्यामध्ये वनांचे फार मोठे महत्त्व आहे. आणि लाखो सजीवांच्या प्रजातींना वने ही आश्रय देताना दिसून येत आहे. झाडे ही जंगलाचा एक महत्त्वाचा घटक आहे परंतु दरवर्षी तेरा दशलक्ष पेक्षा जास्त जंगले ही नष्ट होताना दिसत आहे. हे क्षेत्र जवळजवळ अंदाजे एखाद्या देशाच्या  आकाराचे आहे. अशी जंगले नष्ट होतात तेथील अस्तित्वात असणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती लोक पावतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे हवामान बदलांमध्ये जंगले महत्वाची भूमिका बजावतात. जंगल तोडीमुळे जगातील बारा ते अठरा टक्के कार्बन उत्सर्जन होतो. जे जवळ जवळ जागतिक वाहतूक क्षेत्रातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साइड च्या बरोबरीचे आहे. तितकीच महत्त्वाची निरोगी जंगले ही जगातील प्राथमिक कार्बन शशकांपैकी एक आहेत. 

       जगामध्ये दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीचे खोरे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर जंगले असलेले दिसून येतात. आज जंगलांनी जगाच्या 30% पेक्षा जास्त भूभाग व्यापला आहे. आणि त्यात साठ हजार पेक्षा जास्त वृक्षांच्या प्रजाती आहेत. ज्यात अद्याप अनेक प्रजातीय अज्ञात आहेत. स्थानिक आदिवासी लोकांसह अंदाजे जवळपास जगातील 1.6  गरीब लोकांना जंगलामार्फत अन्न, लाकूड, पाणी आणि औषधी यांची सोय उपलब्ध होताना दिसत आहे. भारतासारख्या कृषी प्रधान देशांमध्ये तर वनांचे महत्त्व हे अत्यंत आहे. केवळ एक इंच जमिनीचा सुपीक थर निर्माण होण्यासाठी अनेक  वर्षाचा कालावधी हा जावा लागतो. परंतु जमिनीची धूप वनांच्या अभावामुळे केवळ एखाद्या पावसाळ्यातच होऊ शकते म्हणून वनांच्या संरक्षणात्मक उत्पादक आणि आर्थिक क्षमतेमुळे वनांना शेती व्यवसायात मोलाचे स्थान प्राप्त झालेले आहे. प्रगत राष्ट्र, विकसित राष्ट्र, आर्थिक व सामाजिक भरभराटीस आलेले राष्ट्र यामध्ये प्रामुख्याने सर्वात जास्त मोठा हातभार लावलेला दिसून येतो. एकेकाळी उन्नत असलेली मेसापोटेमिया, सीरिया, पॅलेस्टाईन अशी अनेक वनसाहारणे उजाड झाले आहेत. हे कटू सत्य आहे. हवामान बदलाशी जुळवून घेणे तसेच जैवविविधतेच्या रक्षण करण्याच्या कामी वन परिसंस्था महत्त्वाची भूमिका बजावते. हवामान बदलास कारणीभूत असलेल्या हरितगृह वायूंना शोषून घेण्याचे तसेच जागतिक तापमान वाढ ओझोन वायूचे कमी होणारे थर नियंत्रित ठेवण्याचे काम हे वनांकडून केले जाते. 

दक्षिण अमेरिका खंडातील ॲमेझॉन नदी खोरेतील किंवा अमेझॉनच्या जंगलाला नोव्हेंबर 2019 ते 20 मध्ये भीषण आग लागली होती. जवळपास तीन आठवडे हे जगातले सर्वात मोठे जंगल जळत राहिले. ॲमेझॉनच्या जंगलाला आग याचा अर्थ पृथ्वीवर ऑक्सिजन निर्माण करणारे अतिशय मोठा स्रोत किंवा ऑक्सिजन हब नष्ट होताना किंवा नष्ट होतोय हे दिसून येत होते. अमेझॉन चे जंगल ही जगातली सर्वात मोठी परिसंस्था आहे. म्हणजे जंगल परिसंस्था प्राणी आणि वनस्पतींच्या अनेक दुर्मिळ प्रजाती फक्त ॲमेझॉन मध्ये आढळतात जंगलांना लागणाऱ्या आगे मुळे वनस्पतींचीच केवळ हानी होते असे नाही तर वन उपजातींची क्षमताही कमी होते. जमिनीचा क्षय होतो आणि जमीन नापीक होते पाण्याची पातळी खाली जाते, वन्यजीवांची होरपळ होते. वन्यप्राणी एक तर भाजून मरतात आणि जे वाचतात त्यांना त्यांचे राहण्याचे ठिकाण नष्ट झाल्यामुळे त्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर हाल होताना दिसून येतात. अलीकडे अशा दुर्घटनांचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे. भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक ठिकाणी बिबट्या घराजवळ दिसला, बिबट्या गावामध्ये आला, गवा दिसणे, जंगली प्राणी दिसणे या बाबी मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. अशा घटना वाढण्याचे कारण म्हणजे वनांचा ऱ्हास म्हणून सर्वप्रथम लोकांमध्ये वृक्ष संवर्धनाच्या बाबतीत वनांच्या बाबतीत वृक्षाच्या महत्त्व याबद्दल जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने या दिनी तसेच कायमच मोठ्या प्रमाणावर वनाचे रक्षण करणे, वनांचा विनाश होणार नाही यासाठी जनजागृती करणे म्हणजे  पर्यावरण बिघाड निर्माण होणार नाही. हाच याचा प्रमुख उद्देश आहे. 

लेखक - डॉ. निलेश काळे 

सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग 

टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी, पुणे.


इतर बातम्या