Breaking news

स्थानिक भुमीपुत्रांच्या हक्कासाठी भाजपा उतरली रस्त्यावर; वेट अँन्ड जाॅय विरोधात आंदोलन

मावळ माझा न्युजचा वाॅटसअप ग्रुप जाॅईन करा व मिळवा बातम्यांचे अपडेट्स क्षणाक्षणात

लोणावळा : मालपाणी उद्योग समुहाच्या वेट अँन्ड जाॅय या वाॅटरपार्क मध्ये काम करणार्‍या 22 स्थानिक युवकांना व्यस्थापनाने कामावरून कमी केले आहे. त्यांना पुन्हा कामाला घ्या या मागणीसाठी आज भाजपाने मुंढावरे येथील वाॅटरपार्क बाहेर आंदोलन केले. स्थानिकांना रोजगार द्या अन्यथा वाॅटरपार्क बंद करा अशी मागणी यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केली. मावळ तालुक्यातील मुंढावरे गावात मालपाणी उद्योग समुहाचा वेट अँन्ड जाॅय हा वाॅटरपार्क प्रकल्प आहे. सुरुवाती पासून काही ना काही कारणाने हा प्रकल्प वादग्रस्त ठरला आहे. दोन वर्षापुर्वी कोविड काळात सर्व काही बंद असताना येथील स्थानिक युवकांना कामावरून कमी केले. आता वाॅटरपार्क पुन्हा सुरु झालेले असताना व्यवस्थापन कमी केलेल्या स्थानिक कामगारांना कामावर घेण्यास तयार नाही. दोन वेळा शांततेच्या मार्गाने व्यवस्थापनाकडे मागणी केली मात्र ते दाद देत नसल्याने आजचे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना बाळा भेगडे म्हणाले वेट अँन्ड जाॅय व्यवस्थापनाला आमचे म्हणणे ऐकावेच लागेल. स्थानिक भुमीपुत्रावरील अन्याय सहन केला जाणार नाही. भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे म्हणाले, आम्ही कालही कामगारांच्या सोबत होतो, आजही आहे व उद्या ही राहू, वाॅटरपार्क व्यवस्थापनाची मनमानी चालवून घेणार नाही. कामगारांच्या न्याय हक्कासाठी ठिय्या आंदोलन करत त्यांना न्याय मिळवून देऊ.

मावळ माझा न्युजचा वाॅटसअप ग्रुप जाॅईन करा व मिळवा बातम्यांचे अपडेट्स क्षणाक्षणात

माजी जिल्हा परिषद सदस्य नितिन मराठे म्हणाले, आमच्या स्थानिक युवकांना कामावर घ्या अन्यथा तुमचा प्रकल्प बंद करा, मावळात रहायचे असेल तर मावळातील तरुणांना रोजगार द्यावाच लागेल अन्यथा यापेक्षा तिव्र आंदोन करू. ह्याला घेणार नाही त्याला घेणार नाही ही भुमिका चालणार नाही. आमच्या तरुणांनी काम केलं नाही तर सांगा, पण आमची मुलं काम करत असताना कोणतेही कारण न देता त्यांना कामावरून कमी केले तर ते आम्ही खपवून घेणार नाही. भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे म्हणाल्या, कोविड काळात उद्योग व्यावसाय बंद असल्याने सर्वजण आर्थिक संकटात होते मात्र त्यानंतर कामगारांना कामावर न घेणे या भुमिकेमुळे कामगारांच्या कुटुंबाची हेळसांड होत आहे. दोन महिने झाले आम्ही व्यवस्थापनाशी चर्चा करतो आहे मात्र ते दाद देत नसल्याने आता त्यांचे रस्ते बंद करणे हाच पर्याय असल्याने आम्ही वाॅटरपार्कचा रस्ता बंद करत आहोते.

इतर बातम्या