Breaking news

अभिमानास्पद बातमी । नॅशनल लेव्हल परफॉर्मिंग आर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत लोणावळ्यातील स्पर्धकांना पाच बक्षिसे

लोणावळा : गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल लेव्हल फरफाॅर्मिंग आर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत लोणावळ्यात तीन स्पर्धकांनी प्रथम तर दोघांनी द्वितीय क्रमांक मिळविला. विविध राज्यांमधून 200 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये लोणावळा शहरातील 7 स्पर्धकांचा समावेश होता. सात पैकी 5 जणांनी हे यश संपादित केल्याने त्यांच्या शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. सहा राज्यांमधील परिक्षक या स्पर्धेसाठी नेमण्यात आले होते. 

    कोरिओग्राफर सुरज सरावते यांच्या बीट पॉपर्स डान्स अकॅडमी लोणावळा यांनी नॅशनल परफॉर्मिंग आर्ट्स चॅम्पियनशिप गोवा येथे परफॉर्म केले. त्यांच्या अकॅडमीची सावी संदीप अंभोरे हिने सोलो डान्स वयोगट 8 ते 11 मध्ये प्रथम क्रमांक, तनुज मेहता आणि श्लोक गावडे यांनी डुएट मध्ये प्रथम क्रमांक, निकिता स्वामी हिने सोलो डान्स वयोगट 17 ते 21 मध्ये प्रथम क्रमांक, वैष्णवी गुप्ता हिने क्लासिकल डान्स मध्ये द्वितीय क्रमांक, सोहम मलिक याने सोलो डान्स वयोगट 14 ते 17 मध्ये द्वितीय क्रमांक मिळवत हे यश संपादित केले.

    पुढील स्पर्धा इंडोनेशियामध्ये होणार आहे. त्या स्पर्धेतले क्वालिफाईड पार्टिसिपेट, इंटरनॅशनल साठी सिलेक्ट होणार आहेत.

इतर बातम्या