Breaking news

Expressway Accident : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भिषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली एक्झिटजवळ गॅसचा टॅकर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने विरुद्ध लेनवर जाऊन पलटी झाला. यावेळी समोरून येणारी वाहने टॅकरला धडकल्याने झालेल्या भिषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती समजल्यानंतर बोरघाट पोलीस यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था यांनी घटनास्थळी धाव घेत मयत व्यक्तीना गाडीतून बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात गॅस लिकेज झाला नाही. पाॅपोलिन गॅस सदर टॅकरमध्ये होता. केमिकल एक्सपर्ट धनंजय गिध यांनी स्पाॅटवर भेट देत टॅकरची पाहणी केली. अग्नीशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य करत अपघातग्रस्त वाहने बाजुला करत वाहतूककोंडी सोडविण्यात आली.

इतर बातम्या