Breaking news

Expressway Accident : एक्सप्रेस वेवर टारझन फेम अभिनेते हेमंत बिरजे यांच्या गाडीला अपघात; तीन जण जखमी

देहूरोड : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर देहूरोड जवळील किमी 84 येथे मुंबई लेनवर टारझन फेम अभिनेते हेमंत बिरजे यांच्या चारचाकि गाडीला बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात हेमंत बिरजे यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगी हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर पवना रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

    या अपघाता विषयी बोलताना हेमंत बिरजे म्हणाले रात्री प्रवासा दरम्यान गोळ्या खाल्या होत्या. त्यामुळे डोळ्यावर गुंगी आल्याने वाहनावरील ताबा सुटला गाडी दुभाजकाला धडकली. सुदैवाने या अपघातात आमच्यापैकी कोणालाही जास्त इजा झाली नाही.

इतर बातम्या