Breaking news

Expressway Accident : खंडाळा घाटात टेम्पो अपघातात चालकाचा मृत्यू; दोन ठिकाणी कंटेनर फिरल्याने वाहतूककोंडी

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात किलोमीटर 41 या ठिकाणी एका टेम्पोच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सदर टेम्पो समोर जाणार्‍या वाहनावर आदळल्याने झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातापासून काहीच अंतरावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी कंटेनर देखील रस्त्यात फिरल्याने सकाळी मुंबईच्या दिशेने जाणार्‍या वाहनांचा वेग मंदावला होता.

     नयुम दस्तगीर शेख (रा. उस्मानाबाद) असे या चालकाचे नाव आहे. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.  अपघाताची माहिती समजताच आय आर बी पेट्रोलिंग व महामार्ग पोलीस यांनी सदरची अपघातग्रस्त वाहने बाजूला केली तसेच रस्त्यामध्ये आडवे झालेले कंटेनर बाजूला केले. कंटेनरने संपुर्ण रस्ता बंद केल्याने वाहतूक थांबली होती. सदरचे कंटेनर बाजुला काढताना मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबविण्यात आल्याने काही अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

इतर बातम्या