Breaking news

माजी मंत्री आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते संपर्क संस्थेतील मुलींना ब्लँकेट व साऊंड सिस्टीम संच भेट

लोणावळा : क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने माजी मंत्री व आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते संपर्क संस्थेतील मुलींना ब्लॅंकेट व साऊंड सिस्टीम संच भेट देण्यात आला. संपर्क संस्था मळवली, भाजे येथे क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या वतीने भेट देण्यात आली असता, फाऊंडेशनचे विश्वस्त सतीश कोंडाळकर तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर पुण्याच्या माजी नगरसेविका व मनपा शिक्षण मंडळ अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर यांनी संस्थेची माहिती घेतली व मुलींना ब्लॅंकेट व साऊंड सिस्टीम भेट दिली. यावेळी आमदार चंद्रकांत दादा पाटील आवर्जून उपस्थित होते.

      यावेळी त्यांनी संपर्क संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी यांच्याशी व संपर्क मधील  मुलींशी संवाद साधला व संस्थेची माहिती घेतली. तसेच मी संस्थेला आगामी काळात नक्की भेट देईल असे आश्वासन दिले. संपर्क संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी यांनी चंद्रकांत पाटील यांचा सन्मान केला. आमदार चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी मळवली येथील गणेश तिकोने, अस्लम भाई शेख, सचिन निंबाळकर, चेतन जोशी, अनिकेत आंबेकर, सागर कुंभार, स्वरूप टकले तसेच संपर्क संस्थेच्या विश्वस्त रत्ना बॅनर्जी, प्रोग्राम सल्लागार नवनीत चॅटर्जी, संपर्क संस्थेचे कार्यकारी अधिकारी अनुज सिंग, व्यवस्थापक सतीश माळी, जन संपर्क अधिकारी प्रदीप वाडेकर, ईशांत सतार्देकर, शाळेचे मुख्याध्यापक चेतन देशमुख आदींसह संपर्क च्या विद्यार्थिनी उपस्थित होते.

इतर बातम्या