Breaking news

हिंदू धर्म व संस्कृती टिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा - हभप निवृत्ती महाराज देशमुख

कार्ला (प्रतिनिधी) : आपल्या अंगात जी ताकत आहे ती जपून वापरा, वेळेचा सदुपयोग करुन पुढे जात असताना हिंदू धर्माचा इतिहास व संस्कृती वाचवण्यासाठी प्रयत्न करत रहावे तसेच मावळ तालुक्यातील लग्नसोहळे हे चर्चेचा विषय झाले असून लग्नात होत असलेला खर्च कमी करा व हा पैसा गावातील शाळा डिजीटल करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन हभप निवृत्ती महाराज देशमुख यांनी किर्तनरुपी सेवा देत असताना मावळकरांना केले.

       बोरज येथे कै हौसाबाई केशव केदारी यांंच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त  महाराष्ट्रातील प्रसिध्द किर्तनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांंची किर्तनरुपी सेवा ठेवण्यात आली होती. 

      यावेळी समाज प्रबोधन करताना निवृत्ती महाराजांनी समाजात होत असलेल्या विविध ज्वलंत विषयावर भाष्य करत आपण आपल्या संस्कृतीला कसे संपवत आहे याची अनेक उदाहरणे देत संस्कृतीचे जतन करा व आपले आयुष्य सुंदर करा असे सांगितले. कार्ला परिसरातील विविध गावातील अनेक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येत यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संयोजन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विवाहसोहळा संस्थापक व माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष केशव केदारी परिवार व बोरज ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.

इतर बातम्या