Breaking news

Maval Loksabha Election | आंदर मावळात मशालीचा झंझावात; संजोग वाघेरे यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वाढतोय पाठिंबा

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ लोकसभेची निवडणूक यावर्षी खऱ्या अर्थाने मतदारांनी हातात घेतली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दहा वर्ष खासदार राहून देखील मतदार संघात सांगता येईल असे एकही काम झाले नाही. तसेच सर्वसामान्य नागरिक व मतदार यांच्याशी कधीच संवाद न साधल्याने, त्यांच्या सुख दुःखात सहभागी न झाल्याने तुटलेली नाळ यामुळे विद्यमान खासदारांच्या विरोधात मावळात मोठा रोष पहायला मिळत असून मतदार यावेळी स्थानिक मुद्दे उपस्थित करत संजोग वाघेरे यांनाच साथ देणार असल्याचे उघडपणे बोलत आहेत. यामध्ये केवळ महा विकास आघाडी नव्हे तर सर्वच राजकीय पक्षाने कार्यकर्ते वाघेरे यांना पाठिंबा देत आहेत. 

     राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी आंदर मावळ भागात संजोग वाघेरे यांच्या प्रचाराची मशाल पेटवत प्रचार पत्रकांचे वाटप करण्यात आले. यावेळी आंदर मावळ भागातील नागरिकांनी यावेळी विकासाला साथ देणार असल्याचे सांगत आम्ही वाघेरे यांच्याच पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले. शिवसेना उपतालुका प्रमुख मावळ सोमनाथ कोंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मावळ युवक उपाध्यक्ष आदिनाथ मालपोटे, शिवसेना उपविभाग प्रमुख रोहीदास असवले, योगेश करवंदे व कार्यकर्ते यांनी घरोघरी जाऊन प्रचारपत्रके वाटून नागरिकांना संजोग वाघीरे पाटील यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. विविध गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी, युवक यांची भेट घेतली. मागील दहा वर्षात या सर्वच घटकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. यामुळे देशातील सरकारच्या विरोधात कमालीची नाराजी मतदारांमध्ये दिसून येत आहे.

इतर बातम्या