Ekvira Devi News : एकविरा देवस्थानच्या प्रश्नांवर विधिमंडळाच्या अधिवेशनात पाठपुरावा करणार - डॉ निलम गोऱ्हे

महानवमी होमाचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लोणावळा : एकविरा देवस्थानच्या विविध प्रश्नांवर विधिमंडळाच्या अधिवेशनात पाठपुरावा करणार असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. निलम गोर्हे यांनी सांगितले. शिवसेना व युवासेना महिला आघाडी आयोजित "बये दार उघड" या मोहिमेचा समारोप आज आई एकविरा देवीच्या दर्शनाने झाला. यावेळी बोलताना डाॅ. गोर्हे म्हणाल्या पुढच्या वर्षीच्या नवरात्रात देवीच्या मूळ दागिन्यांसह पूजा व्हावी हीच इच्छा आहे. शिवसेना परिवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सर्व कुटुंबियांच्या श्रध्दास्थानी असलेल्या श्री एकविरा देवीच्या दर्शनाने आज मनाला वेगळेच समाधान लाभले. एकविरा देवस्थानचे असलेले प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही लवकरच विधिमंडळात एक बैठक घेऊ. या बैठकीसाठी स्थानिक शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांना निमंत्रित करण्यात येईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. निलमताई म्हणाल्या, एकविरा देवीच्या मंदिरातील मुकुट चोरी झाल्याच्या प्रश्नांवर मी पाठपुरावा केला होता. त्याच बरोबर देवीचे दागिने कुठे आहेत याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या दागिन्यांना परत मिळविण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पुढील वर्षीच्या नवरात्रात देवीच्या मूळ दागिन्यांसह पूजा व्हावी हीच इच्छा आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण स्तरावर या परिसरातील जमिनींचा ताबा घेतल्याचे प्रश्न प्रलंबित आहे. यावर लवकरच बैठक घेणार आहे.
मावळ तालुक्यात अनेकांनी लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला असल्याचे नाटक केले. आज मात्र त्यांची अवस्था "खूप मारल्या गप्पा आणि कुठे गेले …" अशी झाली आहे. मावळ वासियांच्या भावनांचा विचार न करता ते आज शिवसेना पक्षाची मूळ विचारधारा सोडून गेले आहेत. मात्र आपण सर्व शिवसैनिक भक्कम आहे. यामुळे आपल्यावर कोणताही परिणाम होणार नाही असे त्यांनी जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, युवासेना पदाधिकारी शीतल शेठ, स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख विश्वस्त जेहलम जोशी, माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, तालुका संघटक सुरेश गायकवाड, जिल्हा संघटिका शैलाताई खंडागळे, महिला आघाडी अध्यक्षा अनिता गोणते, वेहेरगावच्या सरपंच अर्चना देवकर, पुणे महिला आघाडीच्या अश्विनी शिंदे, अनिता परदेशी, ज्योती चांदेरे, अमृत पठारे, स्वाती रणपिसे, सुनीता रानवडे, रुपाली सुतार, पिंपरी चिंचवड येथील वैशाली मराठे, अनिता तुतारे, रोशनी जगताप, ज्योती भालके, वंदना वाल्हेकर, कामिनी मिश्रा, सुवर्णा मगर, प्रतीक्षा घुले, डॉ. वैशाली कुलथे, मुळशी तालुक्यातील सुरेखा तोंडे, सुनिता तोंडे, अपेक्षा तोंडे, सविता तोंडे, बेबी तोंडे, मिनाक्षी तोंडे, कुसगाव संघटिका रोशनी जगताप, वरसोली संघटिका ज्योती चव्हाण, कामशेत शहर संघटिका उषा इंगवले, कामशेत उपसरपंच इंगवले, देहू शहर संघटिका सुनंदा ढमाले, केवरे शाखा संघटिका शोभा दळवी, उप संघटिका निर्मला ढाकोळ, विमल जगताप, गणपत पडवळ, काळूराम हुलावळे, कैलास पडवळ, मोरेश्वर पडवळ, मारुती खोले, उमेश गावडे, राजु देवकर, अशोक पडवळ, शंकर बोरकर, अनिल गायकवाड, शुभम गायकवाड, आकाश तिकोणे, रमेश आगळमे, संजय देवकर, सुनिता देवकर, बबन खरात, महेश खराडे, अजय ढम, शामबाबू वाल्मिकी, संतोष देवकर, प्रसाद शिर्के, सौरभ साबळे, कार्तिक घाडगे, चिराग खराडे, हिंदुराज कोंढभर, रोहन कालेकर, गौरव सुर्वे, कपिल साळवे, तेजस खराडे आदी यावेळी उपस्थित होते.