Breaking news

नांदगाव संपर्क बाल आशाघर अनाथ आश्रमात अन्नधान्य वाटप व मुलांची मोफत आरोग्य तपासणी

लोणावळा : नांदगाव येथील संपर्क बाल आशाघर केंद्रातील अनाथ मुलांसाठी  लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा आणि मनशक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नधान्य वाटप करण्यात आले तसेच मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

     सदर कार्यक्रमास लोणावळा लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. मनोज लुंकड, डॉ. पोपट ओस्वाल, डॉ. कांता ओस्वाल, उद्योजक नंदकुमार वाळंज, देवेंद्र नेलेकर, मिराली नेलेकर, दिलीप आंबेकर, जिगर पटवा, लायन्स पटवा, नंदकिशोर खंडेलवाल, कल्पना खंडेलवाल, अभय जैन, शशिकांत खंडेलवाल, शाशीवाला खंडेलवाल, मनशक्ती केंद्राचे डॉ. सुहास गोसावी, कामगार नेते रवींद्र साठे, अभिजित गायकवाड तसेच कै. सोनू अनाजी वाळंज हायस्कूलचे शिक्षक संजय कुलथे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

     नंदकिशोर खंडेलवाल यांचेकडून पितृ पंधरवाड्याच्या निमित्ताने मुलांना किराणा साहित्याची देणगी देण्यात आली, तसेच डॉ. कांता ओस्वाल यांच्या वडिलांच्या स्मरणाप्रित्यर्थ मुलांना खाऊचे वाटप करत कै. सोनू अनाजी वाळंज हायस्कूलच्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. डॉ. सुहास गोसावी व डॉ. ओस्वाल यांनी संपर्क बाल आशा घर, नांदगाव येथील सर्व मुलांची आरोग्य तपासणी केली. नांदगाव संस्थेचे अधीक्षक मनोज गवळी यांनी सर्वांचे आभार मानले.

इतर बातम्या