Breaking news

जागतिक महिला दिन । लायन्स क्लब ऑफ खोपोली कडून विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचे वाटप

खोपोली (प्रतिनिधी) : लायन्स क्लब ऑफ खोपोली च्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतात. त्याच अनुषंगाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खोपोली शहरातील जनता विद्यालय आणि वसंत देशमुख मेमोरियल स्कूलच्या विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनींचे वितरण करण्यात आले. 

     खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचालित जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिशा राणे आणि वसंत देशमुख मेमोरियल स्कूलच्या संचालिका तेजस्वी उल्हास देशमुख यांनी महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक जाणीवने युवतींसाठी लायन्स क्लब खोपोलीकडून दिल्या गेलेल्या अनोख्या भेटीचा स्वीकार केला. या मशीन मेसर्स ए. आर. टेक्नोसॉफ्ट या कंपनीच्या माध्यमातून पुरविल्या गेल्या आहेत. लायन्स क्लब खोपोलीच्या अध्यक्षा शिल्पा मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रोजेक्ट चेअरमन म्हणून अनुराधा कट्टी यांनी भूमिका बजावली. संगीता पिल्ले, पल्लवी पडवळकर, आशा देशमुख, विकास नाईक, अतिक खोत, अविनाश राऊत इत्यादी लायन मेंबर्सनी या उपक्रमात सहभाग घेतला. अश्याच स्वरूपाच्या विविध उपक्रमातून यंदाचे वर्षभरात महिला सबलीकरणाचा हेतू साध्य करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला गेला. त्याच अनुषंगाने विद्यार्थी वर्गाला "से नो टू स्मोकिंग अँड ड्रग्स" या विषयावर मार्गदर्शनपर सूचना करून बॅचेसचे वितरण करण्याच्या उपक्रमाची सुरुवात केली.

इतर बातम्या