Breaking news

Crime News : अज्ञात कारणावरून सख्या चुलत भावाचा खून; आरोपी फरार

लोणावळा : मळवंडी ठुले (ता.मावळ, पुणे) येथे आपल्या सख्या चुलत भावाचा खून करून एक जण पसार झाला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरारी आरोपीचा शोध सुरू केला आहे. संतोष मारुती वाघमारे (वय 35 वर्षे, रा. ठुले मलवंडी, ता. मावळ, जि. पुणे) असे या मृत व्यक्तीचं नाव आहे. तर खून करून फरार असलेल्या आरोपीचे नाव रघुनाथ बबन वाघमारे (रा. येळसे, ता. मावळ, जि. पुणे) असे आहे.

     ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल मारुती वाघमारे, (वय 30 वर्षे, व्यवसाय मजूरी, रा. ठुले मलवंडी, ता. मावळ, जि.पुणे) याने या संदर्भात फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीनुसार दिनांक 5 जून रोजी सायंकाळी 5 ते दिनांक 6 जून रोजी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान मौजे तिकोणा (ता. मावळ जि.पुणे) गावचे हदीत मळवंडी ठुले येथील पाणलोट क्षेत्राचे दगडावर फिर्यादी याचा चुलत भाऊ रघुनाथ बबन वाघमारे याने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून, कोणत्यातरी हत्याराने संतोष मारुती वाघमारे याच्या तोंडवर, नाकावर मारून त्याला गंभीर जखमी केले. यात संतोष याच्या तोंडातून, नाकातून रक्त आल्याने आणि त्याचे ओठाचे खाली हनुवटीचे हाड मोडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला भा.द.वि.क. 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने हे करीत आहेत.

इतर बातम्या