Breaking news

Crime News : गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एक जण लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या सापळ्यात; पिस्टल पुरविणारा सुद्धा ताब्यात

लोणावळा : गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसासह एक जणाला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी सापळा लावत ताब्यात घेतले. सोबतच त्याला पिस्टल पुरविणार्‍याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. लोणावळा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने यांना गुप्त माहिती मिळाली होती की, पवनानगर परिसरात एक युवक घातक हत्यार बाळगून फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने ऋषिकेश अशोक गायकवाड (वय 19, रा. थुगाव, पवनानगर) याला पिस्टल व जिवंत काडतुसांसह ताब्यात घेण्यात आले असून त्याला पिस्टल पुरविणारा राजकुमार अनिल माने (वय 23) याला कान्हेफाटा वडगाव मावळ येथून ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, प्रभारी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस काँन्स्टेबल विजय गाले, रफिक शेख, संतोष शेळके, प्रविण उकिर्डे, अमित ठोसर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करत आहेत.

इतर बातम्या