Breaking news

सिंहगड शैक्षणिक संकुलामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती अभिनव पद्धतीने साजरी

लोणावळा : सिंहगड शैक्षणिक संकुल मध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती अभिनव पद्धतीने साजरी करण्यात आली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्त महाराजांच्या पुतळ्याचे पूजन विधीवत करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थित विद्यार्थी, पालक, कर्मचारी, पदाधिकारी यांनी पुढील सर्व खर्च टाळून या खर्चाची रक्कम संपर्क शाळा आणि वसतिगृह प्रकल्प भांबर्डे ता. मुळशी यांना मदत म्हणून देण्यात आली.  त्याचप्रमाणे या शाळेच्या मदतीसाठी येथून पुढे संयुक्तपणे विचार व कार्य करण्याचे ठरविण्यात आले. अशा अभिनव पद्धतीने ही शिवजयंती साजरी करण्यात आली.

इतर बातम्या