Breaking news

यशवंत नगर सोसायटी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

मावळ माझा न्युज नेटवर्क : देशमुखवाडी शिवणे येथील यशवंत नगर सोसायटी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जनमोत्सव सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यशवंत नगर परिवर्तन युवा प्रतिष्ठानच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

      प्रतिष्ठानचे अध्यक्ष शितलकुमार कांबळे, उपाध्यक्ष अतुल झोरे, सचिव तानाजी पारगे, खजिनदार दत्ता वाडकर तसेच सर्व प्रतिष्ठान चे सदस्य प्रशांत मंडले, महेश पायगुडे, मोहन देशमुख, रोहीत शर्मा, श्रीमती सुनीता बांदल, सुनिता काळे, सुरेश कुंभार, सुभाष नलवडे, संदीप नाईक, संदीप शिळीमकर, प्रकाश मोरे, संजय मोरे, प्रतिष्ठान चे आधारस्तंभ व सोसायटी माजी सचिव बापू ताडगे, माजी चेअरमन जिजाबा काळे, ज्येष्ठ सदस्य कमलकिशोर शर्मा, सुर्यकांत शेळके, गोपाळ अंकाईकर, दत्तात्रय कुलकर्णी, गोपाळ भणगे तसेच प्रमुख उपस्थिती बांधकाम व्यावसायिक राहुल शेठ पायगुडे, गिर्यारोहक सदस्य अभिजीत पायगुडे, प्रशांत पायगुडे, वैभव पाटील, श्री शिंदे, रुपेश निघोट, श्री पाठक , श्री निवळ यांच्यासह सोसायटीतील सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव कार्यक्रम युवा प्रतिष्ठान च्या मावळ्यांनी नियोजपूर्वक पार पाडला. महिला, मुले, पुरुष सर्वजण पारंपरिक वेशभूषा करून या सोहळ्यात सहभागी झाले होते. अतिशय उत्सहतपूर्ण व आनंदमय वातावरणात हा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणांनी सोसायटी परिसर दुमदुमला होता.

इतर बातम्या