Breaking news

Carrom Tournament : राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेला लोणावळ्यात आजपासून सुरुवात; राज्यभरातील अनेक नामांकित खेळाडूंची उपस्थिती

लोणावळा : राज्यस्तरावरील कॅरम स्पर्धेला (Carrom Tournament) आजपासून लोणावळ्यातील कुमार रिसाॅर्ट येथे सुरुवात झाली.

मावळ तालुक्यातील बातम्यांच्या अपडेटसाठी आजच मावळ माझा न्युज ग्रुप जाॅईन करा

      हिंदूहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य नामांकन शिवसेना परिवार लोणावळा शहर शिवजयंती उत्सव खंडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य कॅरम स्पर्धेचे (Carrom Tournament) उद्घाटन शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते पार पडले. महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करत फित कापून स्पर्धेचा शुभारंभ झाला. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत यांनीही कॅरम खेळण्याचा आनंद घेतला व कॅरम खेळाला (Carrom Tournament) ऑलिंपिक स्पर्धेत स्थान मिळावे यासाठी विशेष प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

मावळ तालुक्यातील बातम्यांच्या अपडेटसाठी आजच मावळ माझा न्युज ग्रुप जाॅईन करा

     याप्रसंगी शिवसेना माजी पुणे जिल्हा प्रमुख व पुणे जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे, भारत देसडला (कॅरम असोसिएशन पुणे जिल्हा अध्यक्ष), अरुण केदार (महाराष्ट्र कॅरम उपाध्यक्ष), नंदू सोनवणे (सचिव), प्राची जोशी (खजिनदार), सुदाम दाभाडे (सहखजिनदार), रावसाहेब कानावडे (सहसेक्रेटरी), निरंजन जहागिरदार (सामाजिक कार्यकर्ते) यांच्यासह शिवसेनेचे ज्ञानदेव जांभुळकर, मारुती खोले, संजय घोंगे, महेश खराडे, माजी विभागप्रमुख सुनील इंगुळकर, विशाल पाठारे, इंद्रजीत तिवारी, दिनेश वीर, गणेश हुंडारे, ओमकार खराडे, सतीश खराडे, चिराग खराडे, तेजस खराडे, निशांत क्षीरसागर, सचिन वाळके, विशाल पातेरे, राज परब, सिद्धांत तावरे, किशोर वाघमारे, शुभम बनसोडे, प्रतीक म्हात्रे, यश खराडे, सौरभ साबळे, चैतन्य खराडे, सतीश गोणते आदी उपस्थित होते.

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानदेव जांभुळकर यांनी केले तर मच्छिंद्र खराडे यांनी सर्वांचे आभार मानले. आजपासून तीन दिव ह्या स्पर्धा लोणावळ्यात होणार असून राज्यभरातील अनेक नामांकित खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत.

इतर बातम्या