Breaking news

Nangargaon Chori : नांगरगावात भरदिवसा बंगल्यात चोरी; कुलूप तोडून पळविला 37 हजारांचा ऐवज

लोणावळा : शिक्षक काॅलनी नांगरगाव याठिकाणी शुक्रवारी (12 नोव्हेंबर) रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने एका बंगल्याच्या कंपाउंडचे व दरवाजाचे कुलूप तोडत चोरी केली. यामध्ये घरातील रोख रक्कम व चांदीचे शिक्के असा 37 हजारांचा मुद्देमाल पळविला आहे.

     याप्रकरणी केतन हिरालाल सावला (वय 45 वर्षे, रा सध्या रा- 12 बी शिक्षक कॉलनी नांगरगाव लोणावळा. मूळ राहणार माटुंगा, मुंबई) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

     लोणावळा शहर पोलिसांनी फिर्यादीवरून दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी साडेबारा ते अडीच वाजण्याच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने बंगला नं 12 बी अप्रथिम व्हिला नांगरगाव लोणावळा याचे कंपाउंडचे व बंगल्याच्या दरवाज्याचे कुलूप तोडत आतमध्ये प्रवेश करून हाॅल व बेडरुम मधून 22 हजार रुपये रोख व 15 हजार रुपये किंमतीचे चांदीचे शिक्के लंपास केले आहेत.

     याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नितिन सुर्यवंशी तपास करत आहेत.

इतर बातम्या