Breaking news

Blood Donation Drive 2022 : मनशक्ती केंद्राच्या वतीने उद्या (1 डिसेंबर) दत्त कुटिर लोणावळ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन

लोणावळा : "रक्तदान हेच श्रेष्ठ दान" मनशक्ती केंद्राच्या वतीने 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान लोणावळ्यातील दत्त कुटीर याठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील दत्त कुटीर या साधना केंद्रात पिंपरी सेरोलाॅजिकल ब्लड बँकेच्या सहकार्याने हे शिबिर होणार आहे. लोणावळ्यातील नागरिक व साधकांनी मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरात सहभागी होत रक्तदान करावे असे आवाहन मनशक्ती केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. आपले एक रक्तदान तीन जणांचे आयुष्य वाचवू शकते याकरिता रक्तदान या श्रेष्ठदान मोहिमेत सहभाग नोंदवावा.

इतर बातम्या