Breaking news

Bhaje News : भाजे गावात ऊन्हाळी बालसंस्कार शिबिर संपन्न

लोणावळा : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाजे गावात एक दिवसीय ऊन्हाळी बाल संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात लाठी काठी प्रात्यक्षिके, चित्रकला व कागदकाम प्रशिक्षण, विविध मनोरंजनात्मक खेळ, आकाशगंगा व ग्रहांची माहितीपर चित्रफीत इ. उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाजे गाव व परीसरातील बालकांनी शिबिराचा मनमुराद आनंद घेतला. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारची संस्कार शिबिरे सतत व्हावीत अशी भावना यावेळी उपस्थित पालकांनी व्यक्त केली. शिबिर आयोजित करण्यासाठी ग्रामपंचायत भाजे, जिल्हा परिषद शाळा भाजे, पोलिस पाटील भाजे, क्राफ्ट प्रशिक्षिका शेळके ताई व भाजे ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले.

इतर बातम्या