Breaking news

भाजपा उद्योग आघाडीच्या पुणे शहर पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

पुणे : भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या पुणे शहर पदाधिकारी नियुक्त्या आज करण्यात आल्या. त्यांना राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, प्रदेश महिला अध्यक्षा सेजल कदम, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पोरवाल आदी मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये नियुक्तीपत्र देण्यात आली.

    यावेळी बोलताना प्रकाश पोरवाल म्हणाले पुणे व रायगड जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री कौशल्य विश्वकर्मा योजना पंचायत समितीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. येत्या काळामध्ये या योजनेची माहिती पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना व्हावी याकरिता पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी पोस्ट अधिकारी श्री येरवडे यांना भेटून त्यांना सोलर योजना राबवण्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच त्यांना पुणे जिल्ह्यामधील सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये याबाबतची माहिती देण्याबाबत सूचना द्याव्यात अशी विनंती करण्यात आली. या पुढील काळामध्ये पोस्ट कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी या योजनेची माहिती व सबसिडी बाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी देखील प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशभरामध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी उपस्थित त्यांना दिली.


 

इतर बातम्या