सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळ्याच्या अविनाश मोगरे यांची ‘Silicon Interfaces’ मध्ये निवड
लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT), लोणावळा येथील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागातील (E&TC) विद्यार्थी अविनाश मोगरे याची Silicon Interfaces या कंपनीमध्ये यशस्वी निवड झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२७ च्या बॅचमधील अविनाश याला वार्षिक ४.२ लाख रुपये (CTC) इतले वेतन पॅकेज मिळाले आहे.
‘Silicon Interfaces’ ही मुंबईस्थित तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी असून ती प्रामुख्याने सेमीकंडक्टर, व्हीएलएसआय (VLSI) डिझाइन, एएसआयसी (ASIC), एफपीजीए (FPGA) आणि सॉफ्टवेअर विकास क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनी चिप डिझाइन, पडताळणी (Verification), तांत्रिक सल्ला आणि प्रशिक्षण सेवा पुरवते. सेमीकंडक्टर व आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील तिचे कार्य विशेष महत्त्वाचे आहे
महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांच्या निवड प्रक्रियेसाठी मार्गदर्शन, कौशल्य विकास आणि मुलाखतीची तयारी करून दिली जाते. या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम म्हणून विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत.
अविनाशच्या या यशाबद्दल सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री, उपप्राचार्य डॉ. एस. एम. गायकवाड, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. मयूर राऊत व कर्मचारी यांनी अविनाश मोगरेचे अभिनंदन करून याच्या उज्ज्वल आणि यशस्वी व्यावसायिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.



















