Breaking news

ढाक बहिरीच्या सुळक्यावर अडकलेल्या दोन पर्यटक युवकांची शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका

लोणावळा : राजमाची किल्ला परिसरात असलेल्या ढाक बहिरीच्या अवघड सुळक्यावर अडकलेल्या दोन पर्यटक युवकांची लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. मंगळवारी 17 नोव्हेंबर रोजी हे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले.

मंगळवारी लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमला एक कॉल आला व दुर्गम अशा धाक बहिरी सुळक्यावर दोन युवक अडकले असून त्यांना रेस्क्यू करावे लागेल अशी माहिती प्राप्त झाली. तातडीने शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने साहित्याची जुळवा जुळव करत ढाक बहिरीच्या दिशेने प्रस्थान केले. शंतनू जोशी वय 25 आणि साहिल तांबे वय 24 हे दोन युवक ढाक बहिरीच्या सुळक्यावर अवघड ठिकाणी जाऊन अडकले होते त्या ठिकाणाहून त्यांना वर जाणे अथवा खाली येणे शक्य झाले नाही. रेस्क्यू पथकाने घटनास्थळाचा आढावा घेतला व त्यानंतर पथकातील काही सदस्यांनी अवघड मार्गाने वर चढत अडकलेल्या युवकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. सुरक्षेच्या दृष्टीने रोप चा वापर करून सायंकाळी दोन्ही युवकांना टप्प्याटप्प्याने खाली उतरवण्यात आले.

या बचाव मोहिमेत सचिन गायकवाड, राजेंद्र कडू, रोहित वर्तक, हर्ष तोंडे, आयुष वर्तक, महेश मसने, यश सोनवणे, आदिती गायकवाड, गणेश भांगरे, अनिकेत बोकील, गोरख कापसे, अतुल आलम आणि सुनील गायकवाड यांनी सहभाग घेतला होता.

इतर बातम्या