Breaking news

शिवसेना l हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त लोणावळ्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी एनसीएमसी कार्ड शिबिराचे आयोजन

लोणावळा : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करून साहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिक संघ विरंगुळा केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा श्रीमती मृदुलाताई पाटील, सर्व कार्यकारिणी सदस्य तसेच शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, महिला आघाडी शहर संघटिका मनिषा भांगरे आणि माजी नगरसेवक शिवदास पिल्ले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

२०० हून अधिक नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ

स्मृतीदिनाचे औचित्य साधून लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने विद्यार्थी, महिला, दिव्यांग (अपंग) व ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी महामंडळाच्या 'एनसीएमसी (NCMC) कार्ड' नोंदणीच्या दोन दिवसीय मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला शहरवासीयांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून २०० पेक्षा जास्त नागरिकांनी स्वतःची नोंदणी केली.

या कार्यक्रमासाठी उपशहरप्रमुख विशाल पाठारे, उपशहरप्रमुख विजय आखाडे, समन्वयक नंदूभाऊ कडू, शहर सल्लागार पराग राणे, उपविभागप्रमुख नरेश घोलप, महिला आघाडी उपशहर संघटिका अनिता गायकवाड, उपशहर संघटिका दिपाली शिरंबेकर, सचिन कंधारे, कुणाल राणे हे उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे रवींद्र कुलकर्णी, दिलीप पवार, पांडुरंग तिखे, सत्यनारायण अग्रवाल, श्रीमती संध्या गव्हले, भगवती अग्रवाल, श्रीकांत शिंदे, माजी उपनगराध्यक्ष धीरूभाई कल्याणजी, संतोष चोरडिया यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्या