Breaking news

निधन वार्ता : आशालता चंद्रकांत सातकर यांचे निधन

वडगाव मावळ : मावळ तालुका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पुणे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चंद्रकांत सातकर यांच्या पत्नी आशालता चंद्रकांत सातकर यांचे गुरुवारी (दिनांक 14 सप्टेंबर) रोजी सकाळी साडेसात वाजता दुःखद निधन झाले. त्या  72 वर्षाच्या होत्या. मागील अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या, त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज (गुरुवार) दुपारी 1 वाजता वैकुंठ स्मशानभूमी खापरे ओढा कान्हे इथे होईल, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. चंद्रकांत सातकर यांना त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात आशालता सातकर यांची मोलाची साथ लाभली. आशालता सातकर यांच्या पश्चात त्यांचे पती पै चंद्रकांत सातकर, पुत्र अजित सातकर, मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

इतर बातम्या