Breaking news

मानव विकास परिषदेच्या लोणावळा युवा अध्यक्षपदी धवल चौहान यांची नियुक्ती

लोणावळा : मानव विकास परिषदेच्या लोणावळा शहर युवा अध्यक्षपदी धवल राजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आली. परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख, युवा प्रदेश अध्यक्ष अनकुर कदम यांनी हे नियुक्तीचे पत्र दिले.

   धवल चौहान हा भाजपाचे माजी शहराध्यक्ष राजेंद्र चौहान यांचा मुलगा आहे. लोणावळा शहर व ग्रामीण भागात युवा वर्गाच्या माध्यमातून ते कार्यरत असतात. मानव विकास परिषद ही समाजातील शोषित वंचित घटकांसाठी काम करणारी संघटना असून चौहान यांच्या माध्यमातून लोणावळा परिसरात परिषदेचे कामकाज चालविले जाणार आहे.

इतर बातम्या