Breaking news

कोथुर्णे निर्भया प्रकरणी सरकारी वकिल म्हणून उज्जवल निकम यांची नियुक्ती करा - ह्युमन राईट्स असोसिएशन फोर प्रोटेक्शन संस्थेची मागणी

पवनानगर : कोथुर्णे बालिका अत्याचार व हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे व या निर्भयाच्या केससाठी विशेष सरकारी वकील म्हणून अँड. उज्जवल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी ह्युमन राईट्स असोसिएशन फोर प्रोटेक्शन या संस्थेच्या वतीने मावळचे तहसीलदार व कामशेत पोलीस स्टेशन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ह्युमन राईट्स सदस्यांनी आज कोथुर्णे गावात जाऊन पिडित कुटुंबांची भेट घेत सांत्वन केले. तसेच त्यांच्या मुलीला न्याय देण्यासाठी ह्युमन राईट्स संघटना तुमच्या सोबत असेल असा विश्वास दिला. शासनाच्या माध्यमातून पिडित कुटुंबांला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली. ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन चे अध्यक्ष एम.डी. चौधरी, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सचिन गाडे, देहूरोडचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोगदंड, मावळ तालुक्याचे जनसंपर्क अधिकारी शांताराम कोंडभर व मावळचे कार्याध्यक्ष निरंजन कांबळे उपस्थित होते. या घटनेतील नराधमाला फाशीचीच शिक्षा व्हायला हवी, याकरिता सदरचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी असोसिएशन कडून करण्यात आली.

इतर बातम्या