Breaking news

Maval News l मावळ तालुक्यातील सर्व शासकीय व धर्मदाय रुग्णालयांमध्ये शासनाच्या योजनांची माहिती देणारे फलक लावण्यात यावे

लोणावळा : मावळ तालुक्यामधील सर्व शासकीय व धर्मदाय रुग्णालयांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची व सवलतींची माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्यात यावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मावळ तालुक्याचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पुण्यातील मंगेशकर रुग्णालयामध्ये घडलेला प्रकार मावळ तालुक्यात घडू नये याकरता प्रशासनाकडून तसेच रुग्णालय व्यवस्थापनाकडून योग्य ती काळजी घेण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

      महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना याची माहिती व त्याचे लाभार्थी आवश्यक कागदपत्रे या सर्वांची माहिती असणारे फलक तसेच रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळ तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे यांनी सांगितले. तसेच या योजनांमध्ये लाभार्थी यांना लाभ देताना कोणत्याही प्रकारची अफरातफर व भ्रष्टाचार होणार नाही याची देखील काळजी प्रशासनाने घ्यावी व सर्वसामान्य नागरिकांना व रुग्णांना शासनाच्या आरोग्यविषयक सवलतींचा फायदा मिळवून द्यावा असे यावेळी सांगण्यात आले.

     मावळ तालुक्यातील रेशनिंग दुकानदारांबाबत अनेक तक्रारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे प्राप्त आहेत त्या अनुषंगाने सर्व रेशमी दुकानदारकांना तहसीलदार कार्यालयाकडून सूचना देण्यात याव्यात व योग्य दिवस वेळ ठरवून त्याप्रमाणे रेशनिंग वाटप सर्व कार्डधारकांना करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये व तलाठी कार्यालयामध्ये अधिकारी अनेक वेळा गैरहजर असतात शासकीय कामे असल्याचे कारण सांगत कार्यालयामध्ये तलाठी सर्कल हे येत नाहीत त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे याबाबत देखील योग्य आदेश पारित करत अधिकारी कोणत्या दिवशी कार्यालयामध्ये हजर असणार याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात यावी अशी मागणी ठोंबरे व त्यांचे सहकारी यांनी केली आहे. या सर्व मागण्यांचे निवेदन शिवसैनिकांच्या वतीने मावळ तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख असलेले तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

इतर बातम्या

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; यंदाचा कलागौरव पुरस्कार अभिनेत्री नम्रता संभेराव व अभिनेते प्रसाद खांडेकर यांना जाहीर