Maval Political News l मावळ तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनता आमदार सुनील शेळके यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार - सूर्यकांत वाघमारे
मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनता आमदार सुनील शेळके यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सचिव व लोणावळा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) हा देशात व राज्यात महायुतीच्या सोबत आहे व महायुतीच्या वतीने मावळ विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीचा धर्म पाळत आमदार सुनील शेळके यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे.
मागील पाच वर्ष मावळ मतदार संघात काम करत असताना आमदार सुनील शेळके यांनी सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका ठेवली आहे. सर्वसामान्य मतदार हाच केंद्रबिंदू मानत त्यांनी विकास कामे केल्याने मावळ तालुक्यातील प्रत्येक सामानातील सामान्य नागरिक हा त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. मावळ तालुक्याचा विकास खऱ्या अर्थाने त्यांनी केला असून येत्या काळात देखील महत्त्वकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मावळ तालुक्याला विकासाची दृष्टी असलेला आमदार हवा असल्याने मावळ तालुक्यातील तमाम जनता व आंबेडकर समाज हा आमदार सुनील शेळके यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.