Breaking news

Accident Breaking : शिलाटणे फाटयावर ट्रेलर व दुचाकी अपघात; लहान बाळासह महिलेचा मृत्यू

लोणावळा : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाच्या हद्दीत आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका भरधाव ट्रेलरची दुचाकीला धडक बसून झालेल्या भयंकर अपघातात लहान बाळासह महिलेचा मृत्यू झाला असून दुचाकी चालवणारी व्यक्ती गंभिर जखमी झाली आहे. MH 14 JZ 1984 क्रमांकाची सदर दुचाकी आहे. MH 46 DF 5833 या क्रमांकाच्या भरधाव ट्रेलरची धडक बसल्याने हा अतिशय भयंकर असा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिक व लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीला उपचारासाठी दाखल केले असून अपघातग्रस्त वाहने बाजुला केली आहेत. पुष्पा पवन शर्मा व त्याचा तीन वर्षाचा मुलगा युवराज पवन शर्मा यांचा या अपघातात मृत्यू झाला असून पवन शर्मा यांच्या पायाला गंभिर मार लागून ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस कर्मचारी शरद जाधवर पुढील तपास करत आहेत.

इतर बातम्या