Karla News l कार्ला ग्रामपंचायत उपसरपंचपदी अभिषेक जाधव यांची बिनविरोध निवड

कार्ला (प्रतिनिधी) : कार्ला ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अभिषेक प्रकाश जाधव यांची शनिवारी (10 ऑगस्ट) बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्ला ग्रामपंचातीचे उपसरपंच किरण हुलावळे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच दिपाली हुलावळे यांंच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. निर्धारीत वेळेत अभिषेक जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंच दिपाली हुलावळे व ग्रामसेवक सुभाष धोत्रे यांनी अभिषेक जाधव यांची बिनविरोध निवड केल्याचे जाहीर केले.
यावेळी एकविरादेवी देवस्थानचे अध्यक्ष दिपक हुलावळे, उपाध्यक्ष मारुती देशमुख, सरपंच दिपाली दिपक हुलावळे, माजी उपसरपंच किरण हुलावळे, माजी उपसरपंच सुनिल शिर्के, कैलास हुलावळे, सदस्या भारती मोरे, उज्वला गायकवाड, सुभाष हुलावळे, प्रकाश जाधव, संतोष मोरे, अंकुश गायकवाड, अनंता हुलावळे, काळुराम देशमुख, ज्ञानेश्वर हुलावळे, विजय जाधव यांनी नवनिर्वाचित उपसरपंच अभिषेक जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. उपसरपंचपदी जाधव यांची निवड झाल्यानंतर त्यांची संपूर्ण कार्ला गावात मिरवणूक काढण्यात आली होती.