Breaking news

रोटरी क्लबने लोणावळ्यात राबवला अनोखा उपक्रम; टुरिस्ट गाईडला दिले टी शर्ट तर भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात घातले रेडियमचे पट्टे

लोणावळा : रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने लोणावळा शहरांमध्ये रविवारी एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये मागील अनेक वर्ष लोणावळा शहरांमध्ये टुरिस्ट गाईड म्हणून काम करणाऱ्या शेलार मामा यांना रोटरी क्लबच्या वतीने गाईड असे नाव असलेले टी-शर्ट व टोपी भेट देण्यात आली. तसेच लोणावळा शहरामध्ये ची भटकी कुत्री रस्त्यावर फिरत आहेत अशा कुत्र्यांच्या गळ्यामध्ये रेडियमचा पट्टा घालण्यात आला. जेणेकरून रात्री रस्त्यावरून फिरताना त्या कुत्र्यांच्या गळ्यातील रेडियम लाईटच्या उजेडात चमकेल व वाहन चालकांना समोर काहीतरी असल्याचे निदर्शनास येईल. हा त्या मागचा हेतू असून त्या माध्यमातून मुक्या प्राण्यांचे होणारे अपघात रोखण्याचा उद्देश असल्याचे रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी सांगितले.

    रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप पवार, रोटरी विजया कल्याण, रोटरी नारायण, रोटरी ढमाले, रोटरी नितीन कल्याण, रोटरी धीरूभाई कल्याणजी, रोटरी पुंडलिक वानखेडे, रोटरी रवी, रोटरी नलावडे, रोटरी शंकर तसेच शिवदुर्ग ॲनिमल रेस्क्यु टीमचे सुनील गायकवाड, अबोली वाकडकर, हर्षल चौधरी, प्रिन्स कुमार हे यावेळी उपस्थित होते.

इतर बातम्या