Breaking news

लोणावळा डायमंड हॉटेल समोर राष्ट्रीय महामार्गावर कारला लागली आग

लोणावळा : जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील मुख्य कुमार चौकात डायमंड हॉटेल समोर आज दुपारी 2.05 वाजता निशान कारला (MH 46 AL 4680) अचानक आग लागली होती. कारच्या बोनेट मधून धूर येऊ लागल्याने कार चालकासह कारमधील इतर तीन प्रवासी तत्काळ कारमधून बाहेर पडले. कारमधून धूर बाहेर निघत असल्याचे पाहून लोणावळा शहर पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे सहायक पोलिस उपनिरीक्षक रमेश भिसे, अनिल शिंदे, वाहतूक वॉर्डन तसेच नजिकच्या दुकानदार, हॉटेल धारक, कर्मचारी व स्थानिकांनी अग्नी रोधक आणि पाण्याच्या सहाय्याने युध्दपातळीवर आग विझविल्याने कारचे मोठे नुकसान टळले असले तरी, कारचा बोनेट जळाला आहे. यादरम्यान जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. जळीत कार बाजुला घेतल्यानंतर दोन्ही बाजूकडील वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आली. सदर आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलिस करीत आहेत .

इतर बातम्या