शिरगाव येथे नागरी वस्तीजवळ सापडला 10 फुटी अजगर

शिरगाव : शिरगाव येथील नागरी वस्ती मध्ये मंगळवारी एक 10 फुटी लांबीचा मोठा अजगर मिळून आला आहे. सूरज भोसले यांना हा अजगर दिसला असता त्यांनी तत्काळ मावळ वन्य जीव रक्षक संस्थेचे सदस्य संतोष गोपाळे यांना ही माहिती दिली. सदरचा अजगर हा लोक वस्ती च्या जवळ असल्या मुळे संतोष गोपाळे यांनी याची माहीती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना दिली व अजगराला सुरक्षित रेस्क्यु केले. तसेच जिगर सोलंकी, निनाद काकडे, सर्जश पाटील यांनी अजगराची तपासणी केली आणि अजगर स्वस्थ असल्याची माहिती वनविभाग वडगाव वनपाल एम. हिरेमठ यांना दिली. अजगरा बद्द्ल माहिती तेथील स्थानिक नागरिकांना देण्यात आली. या रेस्क्यु मध्ये ऋषिकेश मुऱ्हे, प्रज्वल गोपाळे, आदित्य मुऱ्हे, रोहन मुऱ्हे, विराज गराडे यांनी देखील सहकार्य केले.
इंडियन रॉक पायथन (भारतीय अजगर) हा एक बिनविषारी जाती चा साप आहे. हा साप 15 ते 17 फुटा पर्यंत वाढू शकतो. मावळात आता पर्यंत 15 फुट लांबीचा अजगर आढळून आला आहे. वनविभाग आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थे च्या मदतीने या सापांना सुरक्षित रीतीत जंगलात सोडण्यात आले आहेत. अजगर सापचे खाद्य छोटे भेकर, ससे, घुस व इतर प्राणी खातो.
कोणताही वन्य प्राणी जखमी आढळल्यास त्वरित वनविभाग किंवा जवळच्या प्राणीमात्रांना कळवा असे आवाहन प्राणी अभ्यासक, वन्यजीव रक्षक मावळ संस्था रौनक खरे यांनी केले आहे. तसेच वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास वनविभागाला (1926) या क्रमांकावर संपर्क करावा अथवा वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे (9822555004) आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी देखील संपर्क साधावा.