Breaking news

धर्मवीर संभाजी पतसंस्थेला 64 लाख रुपयांचा नफा; पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

तळेगाव दाभाडे : धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 29 सप्टेंबर रोजी नुकतीच पार पडली. दिपप्रज्वलन  संस्थापक खंडू टकले यांच्या हस्ते करण्यात आले व सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय शेटे होते. सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये पतसंस्थेकडे 13 कोटी 96 लाखाच्या ठेवी असून, कर्जवाटप 11 कोटी 97 लाख आहे. पतसंस्थेस रु. 64 लाख नफा झाला असून,  सभासदांना 9 % लाभांश जाहिर केला आहे. संस्थेला लेखापरीक्षण वर्ग "अ" दर्जा मिळाला आहे. या सभेमध्ये सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपापले विचार मांडले व पतसंस्थेच्या अद्यावत कामकाजाबाबत कौतुकही केले. पतसंस्थेच्या या सभेत दै. बचत प्रतिनिधी समाधान शिंदे, प्रविण वडनेरे व शैलेश वहिले यांचा सर्वाधिक रक्कम जमा केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सचिव विनोद टकले यांनी अहवाल वाचन केले, संचालक अमर खळदे यांनी सर्वांचे स्वागत केले व खजिनदार संतोष परदेशी यांनी आभार मानले. तसेच  उपाध्यक्ष दत्तात्रय शिंदे व सर्व संचालक शंकरराव शिंदे, संजय शिंदे, दत्तात्रय पिंजण, केशव कुल, कैलास चव्हाण व्यवस्थापिका सुनिता शेंडे व सर्व सभासद ठेवीदार कर्जदार हितचिंतक व कर्मचारी सर्व दैनंदिन बचत प्रतिनिधी आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच ही सभा यशस्वी करण्याकरिता कर्मचारी वर्ग यांचे बहुमुल्य सहकार्य लाभले.

इतर बातम्या