Breaking news

बारा मावळातील 11 मावळ्यांनी एकाच दिवसात बारा तासात सात किल्ल्यांवर केली चढाई

मावळ माझा न्युज नेटवर्क : बारा मावळातील भोर व मावळ येथील 11 मावळ्यांनी एकाच दिवसात बारा तासात सात किल्ल्यांवर चढाई करत एक अनोखा विक्रम केला आहे.

       महाराष्ट्रातील गड किल्ले हे शिवरायांच्या स्वराज्याचा अनमोल ठेवा आहेत. शेकडो वर्ष होऊन गेले तरी हे गड किल्ले आज देखील शिवरायांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत उभे आहेत. आणि या गडकिल्ल्यांवरती चढाई करण्याची प्रेरणा येथील भटक्यांना देत असतात. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडकिल्ल्यांवरती भेट देणे हे प्रत्येक शिवप्रेमीचे स्वप्न असते. अशाच काही ध्येयवेढ्या गडकोट प्रेमी युवकांनी एकत्र येत मावळातील तब्बल सात किल्ल्यांवर यशस्वीपणे चढाई करून बारा तासांमध्ये हा विक्रम केला आहे. या गिरी प्रेमी गटातील सदस्यांनी हा पराक्रम केलेला आहे. खरे तर हा पराक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या या रेकॉर्ड बुक मध्ये नोंदला जाणार आहे. यापूर्वी कोणत्याही ट्रेकर च्या ग्रुपने आजपर्यंत हा पराक्रम केलेला नाही असे या ग्रुपच्या वतीने शेखर नाणेकर यांनी सांगितले.

     या ग्रुपने आपली सुरुवात सकाळी पाच वाजता राजमाची या किल्ल्याच्या मनरंजन या बालेकिल्ल्यापासून केली. यानंतर श्रीवर्धन हा किल्ला सर केला. यानंतर हा गट राजमाची पासून खाजगी वाहणारे प्रवास करून लोहगड, विसापूरकडे रवाना झाला. या जोडगोळीतील पहिला विसापूर किल्ला या गटाने सर केला यानंतर लोहगडावर आपली पावले ठेवली. लगेचच गड उतार होऊन मंडळी तिकोना गडा कडे रवाना झाली. तिकोना गड तासाभरात गड सर करून मावळे तुंग गडाकडे रवाना झाले. आणि तुंग गड तासाभरामध्येच चढाई करून उतरले देखील यानंतर आता वेळ होती कोराईगड पार करणे आणि सहा गड पार करणे आणि ते पार करून सातवा कोराईगड चढाई करणे आणि उतरणे हे एका आव्हानच होते पण या गटाने हे आव्हान देखील पार करून एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.  

       सुनील चंद्रकांत शेडगे, शेखर शांताराम नाणेकर, रुपेश हरिभाऊ कुंभार, राजेंद्र महादेव चौगुले, लतिफ बापू पटेल, मनोज लक्ष्मण जगताप, रामेश्वर खांडेभराड, बबन कदम, राजेंद्र शिंदे, वसंत विठ्ठल कामथे, अनंता भागवत यांनी हे किल्ले बारा तासात सर केले आहेत.

इतर बातम्या