Breaking news

Maval Loksabha Election : मावळ ग्रामीण भागातील मतदार म्हणतात, यंदा आमचं ठरलंय… बदल हा होणारच

मावळ माझा न्युज : मावळ ग्रामीण भागातील मतदार म्हणतात, यंदा आमचं ठरलंय… बदल हा होणारच… मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या कार्यकर्त्यांनी मावळ विधानसभेचा ग्रामीण भाग जणू पिंजून काढला आहे. त्यांच्या गावभेट बैठका व घोंगडी बैठका यांना नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या बैठकांमध्ये नागरिकांच्या मनातील मागील दहा वर्षातील राग व संताप दिसून येत आहे. ज्यांना आम्ही दहा वर्ष आमचे लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत पाठविले, त्यांनी आमच्या प्रश्नाची सोडवणूक केली नाही अशा भावना नागरिक व्यक्त करत आहे. 

      मावळ तालुक्यामध्ये नात्यागोत्यांचे राजकारण चालते व संजोग वाघेरे यांचा मोठा नातेवाईक परिवार मावळ तालुक्यात असल्याने त्यांचे सर्वच नातेवाईक प्रचारात सक्रिय झाले आहेत. नागरिकांच्या स्थानिक प्रश्नांच्या सोबत बेरोजगारी शेतकरी कामगार यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न व त्यांना रोजगार पर्यटनात्मक विकास याबाबत संजोग वाघेरे यांचे कार्यकर्ते प्रचाराचा अजेंडा राबवत असल्याने तो नागरिकांना भावला आहे. मावळ तालुक्यात सध्या महा युती मधील पक्षांचे नेते हे महायुतीच्या उमेदवारासोबत तर कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. यावेळेस बदल हवा अशाच प्रकारचे वातावरण तालुक्यात सर्वत्र पाहायला मिळत असून त्याचा निश्चितच फायदा संजोग वाघेरे यांना होण्याची शक्यता आहे. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी पक्षामधील असलेले संजोग वाघेरे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांचा सर्वांशी सलोख्याचा संबंध असल्याने त्याचा निश्चितच फायदा वाघेरे यांना होणार आहे.

        महायुतीमध्ये उमेदवारी मिळवण्यावरून भाजपा राष्ट्रवादी अजितदादा पवार काँग्रेस व शिवसेना शिंदे पक्ष या तिघांमध्ये मोठी रस्सीखेच झाली होती त्यावरून अनेक आरोप प्रत्यारोप देखील एकमेकांवर करण्यात आले होते. आता महायुती म्हणून तीनही पक्षांचे नेते एकत्र असले तरी ते मनापासून एकत्र आहेत का याबाबत मात्र साशंकता असल्याने कार्यकर्ते मात्र जेव्हा आपल्या पक्षाचे चिन्ह असेल तेव्हा पाहू आता आम्हाला आमच्या मनाने निर्णय घेऊ द्या अशा प्रकारची ठाम भूमिका घेऊ लागले आहेत. सर्वसामान्य मतदार यांनी तर आमचे यंदा ठरले आहे असेच मत व्यक्त केले आहे. वाघेरे यांचा मितवासी स्वभाव व हसतमुख व्यक्तिमत्व हे मावळच्या ग्रामीण जनतेला भावले आहे. शहरी भागाप्रमाणेच त्यांनी ग्रामीण भागातील अगदी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

इतर बातम्या

महागाई व बेरोजगारीने त्रस्त झालेले सर्वसामान्य नागरिक आपल्याला मतदान करणार नाही याची खात्री पटल्याने भाजपाने राज्यात सर्वत्र फोडाफोडीचे राजकारण केले - निखिल कवीश्वर