Breaking news

कार्ला येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात 15 जोडपी झाली विवाहबद्ध

लोणावळा : कार्ला येथे काल सामुदायिक विवाह सोहळा पार पडला यामध्ये 15 जोडपी विवाह बद्दल झाली आहेत. श्री एकविरा जोगेश्वरी दुर्गा परमेश्वरी ट्रस्ट कार्ला यांच्या वतीने श्री दुर्गा परमेश्वरी मंदिराच्या परिसरात या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.                       

         सामुदायिक विवाहसोहळ्याची सुरूवात सकाळी साखरपुड्यांने झाली. यावेळी माजी सभापती विठ्ठल शिंदे, राजाराम शिंदे, ज्ञानदेव शिंदे, नारायण ठाकर, गणेश धानिवले उपस्थीत होते. हळदीचा कार्यक्रम नवरदेवांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

विशेष म्हणजे या विवाहसोहळ्यात लग्न करणा-या प्रत्येक वधूस एकतोळा सोन्याचे  मंगळसुत्र, कानातील कर्णफुले पायातील पैंजन, जोडवी, नथनी व कन्यादान म्हणून संसारउपयोगी  वस्तु झाल, शिलाई मशिन देण्यात आली. साखरपुडा, हळदीच्या साड्या लग्नाला लागणारा  वर राजास लग्नाचा  सुट  व वधूसाठी शालु 15 याचबरोबर प्रत्येक वरांना वधूनां  मनगठी घड्याळ तसेच  संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या.

          या विवाह समारंभास मावळचे आमदार सुनिल शेळके, युवा सेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक विश्वजीत बारणे, मावळ भूषण ह भ प तुषार महाराज दळवी, गरुड झेप ॲकडमी प्रा डॉ. सुरेश सोनवणे, सरदार पाटील, प्रा विजय मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, शरद पवार गट अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे, शिव सेना नेते मच्छिंद्र खराडे, सरपंच दिपाली हुलावळे, जि सदस्य बाबुराव वायकर, मावळ माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, शिवसेना तालुका प्रमुख अशिष ठोंबरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष यशवंत मोहळ, शिवाजी असवले, सुरेश  चौधरी, सुरेश धोत्रे, सुदर्शन खांडगे, अमोल भेगडे  यांच्यासह  परिसरातील सरपंच, उपसरपंच व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

      संस्थेचे हे विवाहसोहळ्याचे बारावे वर्ष आहे. सोहळ्याचे संयोजन विवाह सोहळा समिती अध्यक्ष बाळासाहेब येवले ,कार्याध्यक्ष राजु देवकर, उपाध्यक्ष अमोल हुलावळे, नवनाथ मालुसरे, मदन नाणेकर, संस्थापक भरत मोरे, दिपक हुलावळे, मिलिंद बोत्रे, मानद अध्यक्ष  बाळासाहेब भानुसघरे, किरण हुलावळे, सुरेश गायकवाड, नंदकुमार पदमुले, रघूनाथ मराठे, गुलाब तिकोणे, अजय शिराली, संजय देवकर, जितेंद्र बोत्रे, संभाजी येवले, मधुकर पडवळ, बबनराव माने, तानाजी पडवळ, किरण येवले, वसंतराव माने, भरत येवले, मारुती येवले, संजय देवकर, अरुण भानुसघरे, संभाजी भानुसघरे, मनोज देशमुख, प्रकाश आगळमे, रोहिदास हुलावळे, सागर जाधव, गणेश पडवळ, संतोष भानुसघरे, सुरेश कडु, संजय देवकर यांच्यासह कार्ला परिसरातील ग्रामस्थ आदींनी केले होते.

इतर बातम्या