Breaking news

पुसाणे गावात महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न; शेतकऱ्यांनी मशाल पेटविण्याचा केला निर्धार

मावळ माझा न्युज नेटवर्क : महाविकास आघाडीचे मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ आज पुसाने गावात इंडिया आघाडीचा मेळावा पार पडला. मावळ तालुका राष्ट्रवादी  शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस पक्षाच्या वतीने या मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्याला पवन मावळातील अनेक पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

       सहकार महर्षी श्री माऊली दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा घेण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा शिवसेनेचे संघटक व माजी जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस निखिल कवीश्वर, शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख भारत ठाकूर, ज्येष्ठ शिवसैनिक व गुरव समाज पुणे जिल्हा अध्यक्ष शंकर शिर्के, शांताराम भोते, माजी नगराध्यक्ष राजू गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.

        मागील 10 वर्षात खासदारांनी तालुक्याला किती निधी दिला ? काय विकास कामे केली याचा पाढा उपस्थित शेतकरी बांधवांनी मांडला. मेळाव्यात खासदार विषयी लोकांच्या तीव्र भावना ह्या निमित्ताने दिसून आल्या. संजोग वाघेरे पाटील यांना चांगल्या मताधिक्याने निवडून आण्याचा निश्चय ह्या निमित्ताने करण्यात आला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शरद पवार यांना फसवणाऱ्या गद्दार लोकांना आम्ही धडा शिकवू अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. 

इतर बातम्या