Breaking news

कोथुर्णे निर्भया प्रकरण : आरोपींच्या विरोधात पोलीस प्रशासनाला सबळ पुरावे मिळाले आलेत - DYSP भाऊसाहेब ढोले

लोणावळा : कोथुर्णे निर्भया प्रकरणातील आरोपी व त्याला मदत करणारी महिला या दोघांना कामशेत पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात सबळ पुरावे पोलीस प्रशासनाला मिळाले आहे. सदरची केस ही जलदगती न्यायालयात चालवत एक वर्षाच्या आत नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी हीच आमची इच्छा व प्रयत्न असणार असल्याची माहिती लोणावळा उपविभागाचे पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांनी दिली. भाऊसाहेब ढोले म्हणाले, पोलीस या केसला बळकटी देण्यासाठी सबळ पुरावे जमा करत आहेत. सर्व तांत्रिक बाबींचा तपास सुरु आहे. लवकरात लवकर ही केस जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा कशी होईल हाच आमचा प्रयत्न सुरु आहे. कोथुर्णे निर्भया प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी हीच मावळातील जनतेची व राजकीय पदाधिकारी यांची इच्छा आहे. ये त्यांची भावना व्यक्त करत आहेत. हा रोष व्यक्त करताना तो शांततेमध्ये केला जावा. जेणेकरून पोलीस यंत्रणेला तपासाला वेळ देता येईल अशी भावना डीवायएसपी यांनी व्यक्त केली. दहा ऑगस्ट रोजी आरोपींची पोलीस कस्टडी संपत असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

इतर बातम्या