Breaking news

KHOPOLI NEWS : रायगड भूषण जगदीश मरागजे यांच्या हस्ते वडवळ ग्रामपंचायतीच्या पथदिप योजनेचे भूमिपूजन

खोपोली (प्रतिनिधी) : खालापूर तालुक्यातील वडवळ गावचे सुपुत्र तथा रायगड भूषण जगदीश मरागजे यांच्या हस्ते वडवळ ग्रामपंचायत हद्दीतील पथदीप योजनेचे भूमिपूजन संपन्न झाले.

   वडवळ ग्रामपंचायत क्षेत्रात येणार्‍या वासोटे, ताकवली, कुसावडे, कसबे तांबी, धवली अशा एकूण पाच गावांचे रस्ते प्रकाशमान करण्याच्या उद्दीष्टाने ही योजना राबवली जाणार आहे. वडवळ ग्रामपंचायतीने भूमिपूजनाच्या निमीत्ताने आयोजित केलेल्या छोटेखानी समारंभात जगदीश मरागजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्याच हस्ते योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. महाराष्ट्राची भाग्यरेखा असलेल्या कोयना धरणाच्या निर्मिती दरम्यान या परीसरात पुनर्वसित झालेल्या कोयना वसाहतीत 1959 नंतर पहिल्यांदाच असा प्रकल्प दृष्टिपथात येणार आहे.

  या कार्यक्रमात माजी सरपंच जितेंद्र सकपाळ, अशोक मरागजे, महेंद्र सावंत, अनिल सावंत, श्रीकांत मरागजे, योगेश शिंदे, श्याम सावंत, विलास सावंत,  मुख्याध्यापक सुधाकर थळे तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच भगवान वाघमारे, उपसरपंच श्वेता कुंभार, सदस्य स्नेहा मरागजे, रमेश गायकवाड, गायत्री सावंत, सुवर्णा शिंदे, सरस्‍वती सावंत, अनिल मरागजे, प्रमोद सकपाळ, सचिन मोरे, त्याचप्रमाणे ग्रामसेवक प्रमोद पाटील यांनी उपस्थिती दर्शवली होती. याचवेळी कोरोना लसीकरण योजनेतील "कवच कुंडल" योजनेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा संकल्प करण्यात आला.

इतर बातम्या