Breaking news

Ketan Agarwal Murder Case l सिया गोयल च्या वकील पत्राचा गोंधळ; सिया कडून आशुतोष श्रीवास्तव यांना तर कुटुंबियांकडून विपुल दुशिंग यांना वकीलपत्र

लोणावळा : लोणावळा शहरालगतच्या लोहगड किल्ला येथे झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणांमध्ये रोज नवनवीन प्रकार समोर येत आहेत. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल व चेतन चौधरी यांची पोलीस कस्टडी 29 जून रोजी संपल्यानंतर त्यांना दोघांना आज वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना 3 जुलै पर्यंत पोलीस कस्टडी वाढवून दिली आहे. हे होत असताना न्यायालयाच्या आवारामध्ये सिया गोयल यांच्या वकीलपत्रावरून गोंधळ सुरू असल्याचे पाहायला मिळाले. ॲड. आशुतोष श्रीवास्तव व ॲड. विपुल दुशिंग हे दोन्ही वकील न्यायालयामध्ये सियाचे वकील म्हणून हजर होते. आशुतोष श्रीवास्तव यांनी केलेल्या ताब्याप्रमाणे सिया गोयल हिने त्यांना याप्रकरणी वकीलपत्र दिले आहे वकीलपत्रावर तिच्या सह्या आहेत. तर तिच्या कुटुंबीयांच्या म्हणण्याप्रमाणे ॲड. विपुल दुशिंग हे त्यांचे अधिकृत वकील आहेत व आम्ही विपुल दुशिंग यांनाच वकीलपत्र दिले आहे. त्यामुळे सिया गोयल यांचे नक्की वकील कोण असा गोंधळ यावेळी पाहायला मिळाला. विपुल दुशिंग यांनी सिंह गोयल हिच्या कुटुंबियांनी मला वकीलपत्र व माझी फी दिली असल्याचे म्हटले आहे. तर आशुतोष श्रीवास्तव यांनी सिया गोयल हिने तिच्या सहीने मला वकीलपत्र दिले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे 3 जुलै रोजी या दोघांपैकी न्यायालयामध्ये कोण युक्तिवाद करणार व कोण सियाचे अधिकृत वकील म्हणून समोर येणार की दोन्ही वकील सियाचे वकील म्हणून न्यायालय मध्ये एकत्रितरित्या बाजू मांडणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

सियाने केतन कडून एक कोटी रुपये घेतल्या बाबत कोणतेही स्पष्टीकरण नाही 

सिया गोयल हिने होणारा पती केतन अग्रवाल याच्याकडून एक कोटी रुपये उकळले व ते तिचा मित्र चेतन चौधरी याला व्यवसायासाठी दिले अशा प्रकारची माहिती माध्यमांमधून पुढे येत आहे. याविषयी बोलताना पोलीस अधिकारी गजानन टोम्पे म्हणाले याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आमच्याकडे आलेले नाही. दोन्ही आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केले होते व त्यांना पोलीस कस्टडी वाढवून मिळालेली आहे. या कस्टडीमध्ये याबाबतची त्यांच्याकडून माहिती घेतली जाईल व त्या मध्ये सत्यता आढळल्यास त्याचा देखील तपास केला जाईल. बाली येथे जाताना पुण्याहून मुंबई एअरपोर्ट पर्यंत केतन अग्रवाल व सिया गोयल ज्या कार मधून गेले होते त्या कारचा चालक मीडियासमोर आला आहे व त्याने प्रवासादरम्यानची माहिती मीडियासमोर दिली आहे. त्याला देखील चौकशीसाठी बोलावून त्याचा जबाब नोंदवला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

इतर बातम्या