Breaking news

Lonavala polio Vaccine Camp l पल्स पोलिओ लसीकरण अभियानांतर्गत लोणावळा शहरामध्ये 6365 बालकांना पोलिओ डोस

लोणावळा : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान अंतर्गत लोणावळा शहरामध्ये 35 ठिकाणी लस केंद्र उभारत 6365 बालकांना आज पोलिओ लस पाजण्यात आली. लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. लोणावळा शहरामध्ये तब्बल 97% लसीकरण आज झाले असून उर्वरित तीन टक्के बालकांना घरोघरी जाऊन पोलिओची लस दिली जाणार आहे. 

    भारत सरकारने 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानांतर्गत शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलिओ लसीकरण विशेष मोहिमेचे आयोजन केले होते. लोणावळा शहरामध्ये यूपीएचसी लोणावळा अंतर्गत पल्स पोलिओ मोहीम वैद्यकीय अधिकारी डॉ निधी ताटिया. डॉ ऋतुजा तांडेल व उपजिल्हा रुग्णालय   लोणावळा वैद्यकीय अधीक्षक डॉ मनोहर सोनवणे, डॉ कराड, आधिपरिचारिका कांचन केंद्रे, आधिपरिचारिका स्नेहल आवारे, आरोग्य सेविका श्वेता कांबळे आरोग्य सेविका वैशाली अंभोरे, आरोग्य सेविका पूजा डगळे यांनी राबवली. प्रभाग निहाय 35 ठिकाणी यासाठी केंद्र उभारण्यात आली होती. दिवसभरामध्ये या केंद्रांवर 6365 बालकांना पल्स पोलिओचा हा डोस देण्यात आला आहे. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या अभियानामध्ये सहभागीत आपल्या बालकांना पल्स पोलिओची लस दिली. 

कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती सभापती दिपाली हुलावळे यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ

कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती सभापती दिपाली हुलावळे यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 52 ठिकाणी लसीकरण मोहीम राबवण्यात आली. लहान-मोठी गावे टोल नाके बस स्थानक या ठिकाणी देखील पल्स पोलिओ लसीकरण केंद्र उभारण्यात आले होते. दो बुंद जिंदगीके असा नारा ते शून्य ते पाच वयोगटातील मुलांना ही लस देण्यात आली. पोलिओमुक्त भारत याकरिता सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

      



इतर बातम्या