शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त लोणावळ्यात ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप; खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते शुभारंभ
लोणावळा : शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवसेना लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर यांच्या वतीने शहरातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
लोणावळ्यातील मुसळधार पावसाची पार्श्वभूमी आणि ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन शहर प्रमुख संजय भोईर यांनी या उपयुक्त उपक्रमाचे आयोजन केले होते. वाढत्या वयात ज्येष्ठ नागरिकांना पावसापासून संरक्षण मिळावे आणि शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य सामाजिक कार्याने साध्य व्हावे, हा यामागील मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग आप्पा बारणे, शिवसेना उपनेते तथा नगरसेविका सुलभाताई उबाळे, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख राजूभाऊ खांडभोर, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव तथा नगरसेवक विश्वजित बारणे, राजेश फलके, बाळासाहेब वाल्हेकर, दिलीप पांढरकर, नवनाथ हारपुडे, एकनाथ जांभुळकर, लोणावळा उपशहर प्रमुख विशाल पाठारे व विजय आखाडे यांच्यासह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















