Breaking news

आनंदवार्ता | मान्सून आज अंदमानात दाखल होणार

मावळ माझा न्युज नेटवर्क : उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंद देणारी घटना म्हणजेच आज रविवारी (19 मे) मान्सून अंदामन मध्ये दाखल होणार आहे. तर केरळ मध्ये 31 मे पर्यंत मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी आवकाळी पाऊस सुरू आहे. सरासरी पेक्षा यावेळी जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.

      दरवर्षी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. यंदा मात्र एक दिवस आधीच म्हणजे 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये येणार आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या तारखेला चार दिवस कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 28 मे ते 3 जूनदरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून हा केरळमध्ये येण्यापूर्वी अंदमान आणि निकोबार बेटांवर शिरकाव करतो. दरवर्षी 21 मे रोजी या बेटांवर मान्सून येत असतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा मात्र 19 मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर तो धडकण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी अंदमान आणि निकोबार बेटांवर 19 मे रोजी मान्सून आला होता. मात्र केरळमध्ये 9 दिवस उशिराने म्हणजे 8 जूनला पोचला. यंदा त्यात काही बदल होतो का ते पाहावे लागणार आहे.

इतर बातम्या