Breaking news

Expressway Container Overturn l खंडाळा घाटात वळणावर कंटेनर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी

लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील अंडा पॉईंट येथील वळणावर मुंबईच्या दिशेने जाणारा एक कंटेनर उलटल्याने मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला अपघाताची माहिती समजल्यानंतर घटनास्थळापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या बोरघाट पोलिसांनी तात्काळ पुलर मशीन व क्रेनच्या सहाय्याने उलटलेला कंटेनर बाजूला ओढत दोन लेन वाहतुकीसाठी खुल्या केल्या. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती तसेच विरुद्ध लेनवर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर अवजड वाहनांमुळे देखील वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडी कमी झाल्यानंतर महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त कंटेनर उभा करत त्याला बाजूला करत मार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे. सध्या उन्हाळा सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक खाजगी वाहनांमधून फिरायला जात असल्याने त्यांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

इतर बातम्या