Breaking news

जुन्नर चे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे निधन

मावळ माझा न्युज : जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे काल निधन झाले. त्यांनी 1985 ते 2009 या काळात चार वेळा जुन्नरचे प्रतिनिधीत्व केले. कुशल संघटक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे नेते असा त्यांना लौकीक होता. गेली काही दिवसांपासून ते आजारपणामुळे राजकारणात सक्रीय नव्हते.

    जुन्नर तालुक्याच्या विकासात महत्वाचे व मोलाचे योगदान असणारे वल्लभ बेनके यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळ व आमदार पदाच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्यांचे आयुष्यमान उंचावण्यासाठी मोलाचा हातभार लावला. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, आमदार अतुल बेनके, युनिकेअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमोल बेनके, उद्योजक अमित बेनके, सूना, नातवंडं, पतवंड असा मोठा परिवार आहे.

इतर बातम्या